top of page
WhatsApp Image 2021-02-26 at 2.22.48 PM.

रामचंद्र प्रतिष्ठानचा सैनिक कल्याण निधी सोहळा

रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेने सैनिकी कल्याण निधी अर्पण सोहळा `सिर्फ' (एसआयआरएफ - सोल्जर्स इंडिपेन्डेन्ट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन) या संस्थेसाठी आयोजित केला. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शिवाजी पार्क येथील मादाम कामा सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी सिर्फ संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, पेण (रायगड) येथील प्रख्यात शिक्षिका सुलभाताई अनंत लोंढे-जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, पेणच्या नगरसेविका तेजस्विनी नेने, समाजसेविका रिमा सावंत आणि शैला साठे तसेच रामचंद्र प्रतिष्ठान संस्थापक विश्वस्त नयना शिंदे आदीं मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
सैनिकांच्या कार्याची जाणीव प्रत्येक भारतीयांमध्ये असायलाच हवी, विशेषतः नव्या पिढीत ती अधिक रुजवणे गरजेचे आहे, असे विचार  सुमेधा योगेश चिथडे यांनी व्यक्त केले. क्रांतिकार्यात ज्यानी आपले सर्वस्व दिले, त्यांची माहिती शालेय अभ्यासक्रमात प्रकर्षाने आली पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनातील थोडेफार कार्य किंवा समर्पण हे देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी केले पाहिजे, असे विचार सुलभाताई लोंढे यांनी व्यक्त केले. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांंचे सैनिकीकरण तसेच राष्ट्रभक्तीचे विचार समजून त्यानुसार आपला अधिक वेळ देशभक्तीसाठी द्यावा, असे आवाहन केले. नगरसेविका तेजस्विनी नेने यांचेही समयोचित भाषण झाले. याचवेळी त्यांनी पर्यावरणाबाबतचा संदेशदेखील दिला. रिमा सावंत यांनी युवकांनी नैराश्याने आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता देशासाठी बलिदान करण्यासाठी स्वतःचा सिद्ध करावे, असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिमा सावंत यांनीच केले. आभार रामचंद्र प्रतिष्ठानच्या संचालिका नयना शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध वयोगटातील मंडळी उपस्थित होती.

Photo 1.jpg

महाराष्ट्राच्या कारागृह विभागाकडील बंद्यांच्या शेती विषयक ज्ञानात भर पडावी व शिक्षा समाप्ती नंतर बंद्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी आणि पिकांचे उत्पादन वाढावे, या हेतूने शेती क्षेत्र असलेल्या कारागृहातील बंदी व कर्मचारी यांच्यासाठी रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने देण्यात आलेल्या कृषी ज्ञान ग्रंथसंपदेचा अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव नयना शिंदे यांच्या हस्ते स्वीकार करताना विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. एस. एस. सोळुंके. यावेळी महाराष्ट्र कारागृह तंत्र अधिकारी (शेती) संजय फडतरे, कारागृह उद्योग अधीक्षक प्रशांत मत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. 

Photo 2.jpg

युवा वर्गातील धुम्रपान रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ, ओल्ड कस्टम हाऊस येथे आयोजित करण्यात आला. यावेळी नागेश कदम (मालवण, सिंधुदुर्ग) यांना प्रथम पारितोषिक देताना मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबवेकर, चिटणीस व मुख्य संघटक अमोल मडामे, ज्येष्ठ कामगार नेते अण्णासाहेब देसाई, प्रा. दीपा ठाणेकर, सुवर्णा शेवाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे व मान्यवर.

CONTACT US 

Tel : 022-24225045, 9821374626, 9867296956

Email : ramchandrapratisthan@gmail.comom

ADDRESS

Hon. President / Hon. Secretary,

Ramchandra Pratisthan,

A/ 202, Ashirwad Society, Chitale Road,

Behind Portuguese church, Dadar (W),

Mumbai, India, 400028.

© 2020 By RAMCHANDRA PRATISTHAN

bottom of page